मागील १४ वर्षातील दीपस्तंभचे यश

मान्यवरांच्या प्रतिक्रिया
“अपनी संतान के लिए तो जानवर भी कुर्बानी देते है, लेकीन जो दुसरों के लिए अपना जीवन समर्पित कर सके वही मानव है । आज ‘मनोबल’ मे आकर यहाँ के शिक्षकों एवं सेवाकों का परिश्रम और समर्पण देखकर मेरा शीष सन्मान से झुक गया है । यह एक प्रयास ही नहीं एक तपस्या है जिसके द्वारा कुछ समर्पित लोग उस कमी को पुरा करने का लक्ष्य लेकर चल रहे हैं, जो ईश्वर भी पुरा न कर सका । मैं संस्था को हार्दिक साधुवाद देता हूँ और अपनी अन्तिम सांस तक अनी सेवाएं एवं सहयोग देने का आश्वासन देता हूँ। ईश्वर सदैव आपके साथ हों ”
शौर्य शाश्वत शुक्ल“मनोबल या केंद्राचे दर्शन झाले. जणू मी स्वर्ग पाहीला ! माझ्यासाठी हे केंद्र प्रेरणादायी ठरलं. येथून माझा प्रवास अधिक तेजोमय होईल.”
बच्चू बाबाराव कडू“दीपस्तंभच्या कार्यांची तुलना करतांना मला फक्त आणि फक्त आनंदवनाची आठवण येते.”
आर. के. सोनवणे“माणसाने स्वतःसोबत दुसऱ्यासाठीही जगायला हवं ! याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मला ‘मनोबल’ केंद्र वाटलं. मला खरोखरच खूप आनंद झाला.”
डॉ. सिध्दार्थ बी बोंदरचला आपण ही या बदलात सहभाग घेऊ या !

स्वयंसेवक होऊ या!
समाजात चांगली मुल्ये रुजविण्यासाठी विविध प्रशिक्षण कार्यशाळा, शिबिरे, उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी दीपस्तंभच्या विविध प्रकल्पांमध्ये आपणही सहभागी होऊ शकता.

सदस्य होऊया!
आपला अनुभव, ज्ञान आणि कौशल्य गरजूंपर्यंत पोहोचू द्या. ग्रामीण भारतातील लोकांना प्रेरणा मिळावी यासाठी आमच्या शैक्षणिक प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता.

आर्थिक मदत
2025 पर्यंत 5 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात शैक्षणिक क्रांती घडवून आणण्याचं स्वप्न आम्ही पाहिलं आहे. ग्रामीण भागातील
विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी, त्यांच्या बुद्धिमत्ता, कौशल्य आणि कष्ट करण्याच्या तयारीनुसार त्यांना योग्य संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपणही योगदान देऊ शकता!

दीपस्तंभ फाऊंडेशनची उद्दिष्टे
- गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कारातून चांगला माणूस व चांगले नेतृत्व विकसित करणे.
- ग्रामीण व आदिवासी भागातील विदयार्थी, पालक तसेच शिक्षकांसाठी विविध उपक्रम राबविणे.
- प्रज्ञाचक्षु (अंध), दिव्यांग (अपंग), अनाथ, आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण तसेच प्रशिक्षण मिळण्यासाठी प्रकल्प व उपक्रम राबविणे.
- वाचन संस्कृती रुजविणे व विकसित करणे.