दीपस्तंभ ही संस्था वंचित समुदायांच्या चांगल्या जीवनासाठी आशा आणि संधींचे प्रतीक असून एका महान राष्ट्रकार्यास सर्वार्थाने हातभार लावते. ही संस्था महाराष्ट्रातील अनेकांच्या जीवनात दृड बदल घडविण्यासाठी मुल्याधारीत शिक्षणाच्या विविध प्रयोगातून योग्य दिशा आणि ज्ञानाचा प्रकाश देण्याचे कार्य करीत आहे.

दीपस्तंभची स्थापना 2005 मध्ये झाली. अंध, अपंग, अनाथ, आदिवासी व ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तरुणांना उत्तम शिक्षण मिळावे, यासाठी आम्ही कार्यरत आहोत. आम्हाला विश्वास आहे कि शिक्षणामुळेच स्वतःतील क्षमता ओळखून, उत्तम भविष्य घडविण्यास या वंचित घटकांना मदत होईल.

स्वामी विवेकानंद, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, साने गुरुजी, कर्मवीर भाऊराव पाटील आणि कर्मयोगी बाबा आमटे दीपस्तंभ परिवाराचे प्रेरणास्थान आहेत.

तळागाळातील  या घटकांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाने त्यांचा विकास होईल आणि त्यातूनच हे राष्ट्र प्रगतीपथावर जाईल हा आम्हाला विश्वास आहे.

आपण जे वाचतो, प्रेरीत होतो, ज्यांना आदर्श मानतो, त्यांच्याप्रमाणे आपल्याला कृती करता आली पाहिजे.

यजुर्वेंद्र महाजन

संस्थापक आणि कार्यकारी संचालक , दीपस्तंभ फाऊंडेशन

यजुर्वेंद्र महाजन –

सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणतज्ज्ञ,

अंध, अपंग, अनाथ, आदिवासी युवकांसाठी समुपदेशक आणि प्रशिक्षक.

शिक्षक आणि पालक प्रशिक्षक,

करिअर सल्लागार, वक्ते आणि अनेक पुस्तकांचे लेखक.

आपण जे वाचतो, प्रेरीत होतो, ज्यांना आदर्श मानतो त्याप्रमाणे आपल्याला कृती करता आली पाहिजे, असं वाटून २००५ साली पुणे येथील उत्तम काम व संधी सोडून जळगांव, धुळे, नंदुरबार या ग्रामीण व आदिवासी भागात काम करण्यासाठी यजुर्वेंद्र महाजन परत आलेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण आणि आदिवासी भागातील वंचितांपर्यंत पोहचावे तसेच चांगला माणूस व चांगले नेतृत्व निर्माण व्हावे, यासाठी समविचारी मित्रांसोबत त्यांनी दीपस्तंभ फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली.

दीपस्तंभचे काम केवळ आर्थिकदुर्बल घटकांपुरतेच केंद्रित नाही; तर अंध, अपंग, अनाथ व आदिवासी भागातील तरुणांसाठी विस्तारले आहे. चांगला माणूस, चांगले नेतृत्व व महान देश घडविण्यासाठी हा प्रवास महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विविध आयामांनी विस्तारत गेला आहे.

विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, कौशल्य प्रशिक्षण केंद्र, समुपदेशन केंद्र, ग्रामीण शिक्षण क्रांती केंद्र, वाचन संस्कार अभियान, पालक -शिक्षक प्रशिक्षण या उपक्रमांचा समावेश आहे.

एक तपाच्या या प्रवासात शेकडो संवेदनशील व्यक्ती तन, मन व धनाने सोबत आहेत. उत्तम टीमवर्कमुळेच हे अत्यंत आव्हानामत्क प्रकल्प सुरु झालेत व त्यात सातत्य टिकून आहे.

चला आपण सर्व मिळून हे जग अधिक सुंदर करूया व आपले जीवन अधिक अर्थपूर्ण करूयात!

दृष्टी

वंचित घटकांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी उपलब्ध करून चांगला माणूस घडविणे आणि संवेदनशील नेतृत्व विकसित करणे.

मिशन

2025 पर्यंत सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणे.

आमची कोअर टीम

यजुर्वेन्द्र महाजन

यजुर्वेन्द्र महाजन

राजेंद्र डी. पाटील

राजेंद्र डी. पाटील

अनिल कांकरिया

अनिल कांकरिया

लक्ष्मण सपकाळे

लक्ष्मण सपकाळे

डॉ. राजेश डाबी

डॉ. राजेश डाबी

डॉ. रूपेश पाटील

डॉ. रूपेश पाटील

सिद्धार्थ बाफना

सिद्धार्थ बाफना

 शैलेश कोलते

शैलेश कोलते

मीनाक्षी  निकम

मीनाक्षी निकम

डॉ. रेखा महाजन

डॉ. रेखा महाजन

सौ. संध्या सूर्यवंशी

सौ. संध्या सूर्यवंशी

सौ. सविता भोळे

सौ. सविता भोळे