ग्रेट-भेट

“एक व्याख्यानमाला, जिथे प्रख्यात वक्ते व यशस्वी व्यक्तींना ऐकण्याची तसेच प्रत्यक्ष संवाद साधण्याची सुवर्ण संधी मिळते. विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक विषयांचं हे प्रबोधन म्हणजे आबालवृद्ध सर्वांसाठीच वैचारिक मेजवानी! चांगल्या विषयांसाठी वक्त्यांचे हक्काचे व मुक्त व्यासपीठ म्हणून ‘दीपस्तंभ’ ची ओळख होऊ लागली आहे. यजुर्वेंद्र महाजन यांचेसह देशातील जवळ जवळ १८० सुप्रसिद्ध व्यक्तींची व्याखाने ‘ग्रेट-भेट’च्या माध्यमातून झाली आहेत.”

ग्रामीण व दुर्गम भागात राहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांना विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी व यशस्वी लोकांच्या मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागू नये म्हणून ग्रेटभेट हि व्याख्यानमाला सुरु करण्यात आली. लहान मुलं, तरुण, मध्यमवयीन, ज्येष्ठ अशा सर्वांनाच जग बदलवण्यासाठी धडपडणाऱ्या यशस्वी व्यक्तींचं जगणं प्रत्यक्ष संवादातून अनुभवता येतं. असे परिसंवाद व चर्चासत्रे परस्परसंवादी शिक्षणाचे वातावरण तयार करतात व सर्वांना प्रेरणा देतात. असे कार्यक्रम दर महिन्यात घेतले जातात. दीपस्तंभच्या या व्याख्यान उपक्रमास मिळत असलेली श्रोत्यांची वाढती उपस्थिती उद्दिष्टाला पूरक आहे.

आपल्या हृदयस्पर्शी, परखड प्रेरणादायी व्याख्यानांनी तरुणांमध्ये तसेच जेष्ठांच्याही मनात व जीवनात परिवर्तन होण्यास सुरवात होते, असे लक्षात आल्यावर यजुर्वेंद्र महाजन यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी महाराष्ट्रासह मध्यप्रदेश व गुजरात मध्ये ग्रामीण भागात १८०० हून अधिक व्याखाने दिली आहेत तसेच सुमारे १० लाख व्यक्तीशी संवाद साधला. शिक्षण, समाजभान, देशप्रेम, माणुसकी, प्रेरणा अशा अमूलाग्र दृष्टिकोन बदलणाऱ्या विविध विषयांवरील त्यांच्या व्याख्यानांनी अनेकांच्या जीवनात मोठ्या प्रमाणात आत्मविश्वास जागृत झाला व शिक्षणातील गुणवत्तेच्या क्रांतीची बीजे रोवली गेली आहेत.

Testimonial of Renowned Dignitaries & Student

“यजुर्वेंद्र सरांचे व्याख्यान खूप प्रेरणादायी होते. त्यामुळे माझ्या जीवनात अमुलाग्र बदल घडून आला. मी संपूर्ण निराश झालो होतो. पण आता माझा आत्मविश्वास जागृत झाला आहे. धन्यवाद सर . ”

मनोज विलासराव तलरंधे

विद्यार्थी

“माझ्या ४८ वर्षांच्या आयुष्यात मी पहिल्यांदा विचारांना चालना देणारे व्याख्यान ऐकले. सरांचे शब्द आणि व्याख्यानाची पध्दत ही एकदम वेगळी आहे. ती आपल्या हृदयाचा ताबाच घेते आणि त्याचा परिणाम हा दीर्घकाळ टिकणारा असतो.

श्री. सतीश चौधरी

शिक्षक, किनवट, जि. नांदेड

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उपक्रमामधील प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी, अनाथ, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.