गुरुकुल

कर्मवीर भाऊराव पाटील शिष्यवृत्ती योजना

गरीब, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा निवासी प्रशिक्षण केंद्र

ग्रामीण व आदिवासी भागातील अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीवर व इतर अनेक संकटांवर मात करून काही विद्यार्थी उत्तम गुणांसह पदवीधर होतात. मात्र आत्मविश्वास, मार्गदर्शन व आर्थिक सहकार्याच्या अभावामुळे त्यांना उच्च स्पर्धा परीक्षांसाठीचे मार्गदर्शन घेता येत नाही. त्यामुळे ते स्पर्धेत टिकू शकत नाहीत. अशा विद्यार्थ्यांना गुरुकुल या प्रकल्पामध्ये  नि:शुल्क निवासी प्रशिक्षण दिले जाते.

स्पर्धा परीक्षांसाठी राज्यस्तरीय लेखी प्रवेश परीक्षा व मुलाखतीद्वारे गरीब, शेतकरी, शेतमजूर, कामगार, व्यसनग्रस्त किंवा आजारी कुटुंबातील, घटस्फोटित  तरूण महिला, देवदासी भगिनींची मुले, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले आणि प्रचंड आर्थिक समस्याग्रस्त कौटुंबिक पार्श्वमूमी असलेल्या विद्यार्थ्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना खालील सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात.

  • निवास, भोजन व प्रशिक्षण.
  • समुपदेशन, करिअर निवड मार्गदर्शन व विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण.
  • ग्रंथालय, अभ्यासिका.
  • कमवा व शिका योजना.

गुरुकुलची वैशिष्ट्ये

  • दरवर्षी सुमारे १५०+ विद्यार्थी.
  • २०१६-१७ मध्ये ७० + विद्यार्थी विविध पदांवर नियुक्त.

   

प्रकल्प सल्लागार

डॉ. नरेंद्र जाधव( सुप्रसिद्ध लेखक व जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ ), श्रीमती लीनाताई मेहंदळे( माजी प्रधान सचिव ), श्री. इंद्रजीत देशमुख( अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर ),
श्री. संदीप साळुंखे ( अतिरिक्त आयकर आयुक्त ), डॉ. राजेंद्र भारुड ( IAS ), श्री. प्रविण चव्हाण(IRS), श्री. गणेश पाटील( SP-Excise ), श्री. टेकचंद सोनवणे, डॉ. के.बी.पाटील

मान्यवरांच्या प्रतिक्रिया

“महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातील गरीब, शेतकरी, शेतमजुरांचा मुला- मुलींसाठी दीपस्तंभने तन मन धनाने जे कार्य उभारले आहे, ते बघून मनःपूर्वक आनंद वाटला. यामुळे असंख्य विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्याची खात्री वाटते.”

पद्मश्री नीलिमा मिश्रा

मॅगसेसे अवॉर्ड सन्मानित

“महाराष्ट्रातील हा एक अद्वितीय असा उपक्रम आहे, जिथे समाजातील तळागातील विद्यार्थी निवडून, त्यांना मोफत प्रशिक्षण देऊन सामाजिक समतोल साधण्याची एक अतिशय स्तुत्य अशी चळवळ चालविली जात आहे. दीपस्तंभ फाऊंडेशनचा एक अभिन्न अंग असल्याचा मला अभिमान वाटतो”

डॉ. राजेंद्र भारूड

आदिवासी समाजातील प्रथम आयएएस अधिकारी

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

“मी चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या उमर्टी या आदिवासी पाड्यावर राहते. माझ्या वडीलांना दिसत नाहीं. माझी आई शेतात काम करते. दीपस्तंभच्या कर्मवीर भाऊराव पाटील प्रशिक्षण योजने मध्ये मला 1 वर्ष निवास, भोजन व प्रशिक्षणाची व्यवस्था झाल्याने मी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन विक्रीकर निरीक्षक झाले आहे. माझ्या आई वडीलांना मी काय यश मिळवले आहे हे ही समजत नाहीं. आदिवासी भागातील माझ्या सारखे विदयार्थी ‘दीपस्तंभ’ मुळे अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण करू शकतात .”

निर्मला प्रेमसिंग पावरा

उमर्टी, ता. चोपडा जि. जळगाव

“सर्वप्रथम मी दीपस्तंभचे सर्व सदस्य तसेच देणगीदारांचे मनापासून आभार मानते. ही संस्था नसती तर मी माझ्या आयुष्यातील खूप मोठ्या धक्क्यातून सावरले नसते व शिक्षणही घेऊ शकले नसते.मी वझर (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील असून आमची आर्थिक परीस्थिती अत्यंत हलाखीची आहे. जुन महिन्यात 1 एका जमिनीच्या वादातून माइया आईला गावातील काही लोकांनी जिवंत जाळून टाकले. त्यात माझी आई वारली. या धक्चयामुळे माझे वडील कुठेही काम करु शकत नाही. अशा अत्यंत विचित्र व बिकट परीस्थितीत दीपस्तंभने मला विनामुल्य प्रशिक्षण व इतरही सर्व सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. आता माझ्यासाठी सर्व काही ‘दीपस्तंभ’ आहे. मला अधिकारी होऊन समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नायनाट करुन सज्जनांचे रक्षण करायचे आहे”

द्रौपदी तुलसीराम पजई

वझर, ता. जिंतूर, जि. परभणी

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उप्क्रमामधील प्रज्ञाचक्षु दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी अनाथ, विद्यार्थ्यांनीच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.