आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान

‘ग्रामीण भागासाठी मूलभूत सुविधांची उपलब्धता आधीपासूनच सुरु आहे म्हणून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाची व्याप्ती वाढविण्याची संधी मिळते, त्यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या करिअर निवडीबद्दल जागरुकता वाढते.

नजीकचा काळात विविध माध्यमांच्या झालेल्या बेसुमार वाढीमुळे एकूणच वाचनाची आवड कमी झाली आहे. आधीच ग्रामीण भागामध्ये मुलभूत सुविधांची कमतरता असते. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने बघण्याचा आत्मविश्वास निर्माण होण्याची संधी मिळते; आणि विविध करिअर संधी माहिती मिळते. कर्तृत्ववान व्यक्ती, भव्य – दिव्य संस्था यांच्या भेटीतुन विद्यार्थ्यांना अमूल्य मार्गदर्शन व प्रेरणा मिळते. शिक्षकांसाठी त्यांना शिक्षणातील अभिनव प्रयोग, व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन, करिअर, अभ्यास या विषयांचा आवाका यावा तसेच जबाबदार शिक्षकांची फळी निर्माण होते.

विदयार्थ्यांची प्रतिक्रीया

“दीपस्तंभ आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियानातील सहभाग व अभ्यासदौरा हा संपूर्ण प्रवास म्हणजे स्वत:चा नव्याने शोध घेण्याची संधी होती. यातुन आम्हाला आमच्या  परीघाबाहेरच्या एका मोठ्या विश्वाचे दर्शन झाले. आपल्या आजुबाजूला घडणाऱ्या घटनांकडे किंबहुना आमच्या संपूर्ण आयुष्याकडे बघण्याच्या दृष्टीकोणात अमुलाग्र बदल झाला. ”

दीपक आधार पाटील

विद्यार्थी - जामनेर

“अवांतर वाचनाच्या बाबतीत घेतलेला हा देशातील सर्वात मोठा पुढाकार आहे. इथे लाखो ग्रामीण विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पुस्तके वाचताना आणि विकासाच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकताना बघून एका अद्भुताचा अनुभव होतो. दीपस्तंभचे हे कार्य अगदी त्यांच्या नावाला साजेसे असे आहे”

उत्तम कांबळे

साहित्यिक व महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उप्क्रमामधील प्रज्ञाचक्षु दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी अनाथ, विद्यार्थ्यांनीच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.