स्वयंदीप

“शारीरिक व्यंगाचं दु:ख, त्यातून वाट्याला येणारी असहायता, जगणं परावलंबी करणारी अगतिकता, वर्तमान भेसूर करणारी अवहेलना हा सगळा मनातला अंध:कार बाजुला झटकण्याची जिद्द आणि संकटांना भिडण्याचं धाडस दाखवणाऱ्या अशाच अपंग पण महत्त्वाकांक्षी भगिनींसाठी ‘स्वयंदीप’ हा प्रकल्प सुरू झालेला आहे. नियतीच्या निर्णयाला न जुमानता स्वयंप्रेरणेनं, स्वकष्टानं आपलं आयुष्य अर्थपूर्ण करण्यासाठी जीवनाशी लढण्याकरीता सज्ज होत असलेल्या या भगिनींना प्रोत्साहन द्यायला हवं !”

शेकडो अपंग महिलांना नियमित रोजगार सोबतच आत्मविश्वास, आत्मसन्मान व आनंदी जीवन मिळावे, असे ‘स्वयंदीप’चे उदीष्ट आहे. या प्रकल्पात सध्या २५ महिला कार्यरत असून एकाच जागी कामाचे ठिकाण, सोयीनूसार निवास, भोजन व ज्ञानरंजनाची व्यवस्था असावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या महिला युनिफॉर्मस, फॅन्सी ड्रेसेस, पिशव्या, नऊवारी साड्या इ. कपडे अतिशय उत्तम शिवतात. आपण त्यांना ऑर्डर्स मिळवून देणे, आधूनिक शिलाई मशिन्स मिळवून देणे अशा प्रकारचे आपण सहकार्य करू शकतो.

Testimonial of Renowned Dignitaries & Student

“मुलींचा अभिप्राय,
मी रखमा गायकवाड, दोन्ही पाय 100%अपंग ,रा, शिरजगाव ता, चाळीसगाव,जि, जळगाव, माझी आर्थिक परिस्थिती खूप हलाकीची होती,माझे आई – वडील मोल मजुरी करतात, मला उचलून न्यावे लागत असल्यामुळे माझे शिक्षण चौथी पर्यंत झाले, मी घरातच बसून असायची,कुणी दिले तर मिळायचे.
एक दिवस चाळीसगावात अपंगांसाठी साहित्य वाटपाचा कार्यक्रम होता, मला सायकल मिळावी म्हणून माझी आई मला उचलून तिथे घेऊन गेली,तिथे मीनाक्षी ताई भेटल्या, ताईंनी माझ्याजवळ येऊन माझी विचारपूस केली, माझ्या डोळ्यातले पाणी जिरवत मी ताईंकडे बघितले, मला काय अपेक्षित होते ते ताईंनी ओळखले.
स्वयंदीपच्यी स्थापना करताच ताईंनी मला बोलावले आणि सांगितले हे तुझं हक्काचं घर, अडथळा विरिहित सगळं, जणू ताईंनी माझा विचार करूनच स्वयंदीपची स्थापना केली. त्या दिवशी पहिल्यांदा मला माझे आयुष्य खर्या अर्थाने जगायला सुरवात केली असे वाटू लागले,आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आम्ही स्वयंदीप मध्ये आनंदी जगू लागलो. माझ्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन ताईंनी मला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. मला मराठी सुद्धा बोलता येत नव्हते, म्हणून मी बोलायला घाबरत होते, मला काळोखातून प्रकाशात आल्यासारखं वाटते. मी आत्ता सगळ्या प्रकारचे शिवण प्रशिक्षण स्वयंदीप मध्ये घेऊन उद्योग करते. माझा पूणॅजन्म झाला असे मी म्हणेल. माझे अपंगत्वामुळे कुणी मला बाहेर गावी सुद्धा नेत नव्हते. स्वयंदीप मध्ये आल्यापासून आम्हाला दर रविवारी बाहेर फिरायला ताई पाठवतात. खूप छान वाटते बाहेरचे वातावरण, समाजातले सगळे लोक आम्हाला ताईंबरोबर भेटायला येतात, आमच्या ट्रिप जातात, सगळ्या सणांचा आनंद आम्हाला एथे मिळतो. जन्मापासून वाटत होते आम्हीही जगावं; पण जगता येत नव्हते. मीनाक्षी ताई आमच्या ताई नाही तर आई आहेंत. आईला तरी सांगावे लागते मला काय हवे पण ताईंना सांगावे लागत नाही, माझं आयुष्य एक अडगळ सामानाप्रमाणे होते. ताईंनी स्वयंदीप हे हक्काच घर देऊन मला नवीन आयुष्य दिले.”

रखमा गायकवाड

विद्यार्थी

Testimonial of Renowned Dignitaries & Student

 

It is one of the greatest and inspiring works of humanity by the specially abled, for the specially abled. Hats off to all divyang sisters for their courage  & confidence.”

 

Bhaveshji Bhatiya

Sunrises Candles, Mahabaleshwar

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उपक्रमामधील प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी, अनाथ, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.