विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी अभिनव प्रकल्प

आत्मविश्वास व प्रेरणा वाचन अभियान

“शिक्षण दृष्टिकोण देते, तर प्रशिक्षण पारंगत करते. मात्र ग्रामीण भागात ( अगदी शहरातही ) वेळोवेळी योग्य प्रशिक्षण उपलब्ध होत नाही. देशाचं भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या गाव – खेड्यातील शिक्षकांना आणि मुलांचं मानसशास्त्र बळकट करणाऱ्या पालकांना यथोचित व सातत्याने प्रशिक्षण मिळावे, यासाठी या उपक्रमांतर्गत प्रयत्न केले जातात.”

पालक व शिक्षक यांचा विदयार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असतो. शिक्षक ज्ञानसमृद्ध व विवेकी झालेत, तर आदर्श विद्यार्थी घडतात आणि विद्यार्थी घडले, तर देश महान होतो. समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या पेशांपैकी शिक्षकी पेशा अतिशय महत्वाचा आहे. शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर अनेक शिक्षकांना खऱ्या अर्थाने शिकण्यासाठी, अभ्यासासाठी, आपल्या ज्ञान व कौशल्यात भर घालण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळतेच असे नाही. (किंवा ते घेत नाहीत.) तसेच शिक्षण पद्धतीत व एकूणच जगात होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने व ते बदल जाणून घेण्यासाठीच्या आवश्यकतेनुसार स्वतःमध्ये बदल करून घेणे हे विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी खूप गरजेचे असते. म्हणून सुसंस्कारीत पिढी घडविण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या बदलत्या मानसिकतेच्या गरजा भागविण्यासाठी शिक्षकांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. त्यासाठी दीपस्तंभने आजवर महाराष्ट्रातील 30000 हुन अधिक शिक्षकांसाठी प्रेरणादायी व्याख्याने व प्रशिक्षणाचे आयोजन केलेले आहे.

शिक्षक प्रशिक्षण

  1. व्यक्तिमत्त्व विकास
  2. इंग्रजी प्रशिक्षण
  3. करिअर निवड तसेच व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका
  4. शिकविण्याच्या नव – नवीन पद्धती
  5. शिक्षकांचा अभ्यास

पालकांसाठी प्रशिक्षण

  1. सुजाण पालकत्व
  2. मुलांची मानसिकता आणि पालकांची भूमिका

मान्यवर व शिक्षकांची प्रतिक्रीया

“दीपस्तंभ आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत उपस्थित राहून स्वतःच्या जीवन जगण्याच्या पद्धतीतील कमतरता, उणीव, व गुण यांचे अवलोकन करण्याची दृष्टी मिळावी. असे उपक्रम वारंवार नियमितपणे व्हावेत.”

श्री संजय जगताप

प्रा. शिक्षक देवगाव देवळी, ता. अमळनेर जि. जळगांव.

“सदर शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेत Brain Washing व मेंदूची, मनाची व विचारांची साफसफाई होण्यास मदत झाली.पाण्यात खूप ताकद असते पण ते वाहते असेल तर, साचलेल्या पाण्यात कृमी होतात. शिक्षकांना कार्य प्रेरणा देवून वाहते केल्याबद्दल श्री यजुर्वेंद्र महाजन सरांचे सर्वस्वी धन्यवाद.”

श्री अविनाश माळी

प्रा. शिक्षक तांदुळवाडी, ता. भडगाव जि. जळगांव.

शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांना उत्तेजना देत प्रशासकीय सुधारणा घडविणे अतिशय आवश्यक आहे. आणि शिक्षकांना प्रेरित करण्यासाठी नेमके काय करायला हवे हे यजुवेंद्रला बरोबर ठावूक आहे. यजुर्वेद्रकडून शिकण्यासारखे असे खूप आहे. माणसामधील चांगुलपणा शोधला जाऊ शकतो व त्याला त्यावर कामही करायला शिकवले जाऊ शकते. जसं मी शिक्षकांच्या रागाचा भडका उडवण्यातला तज्ज्ञ आहे, त्याच्या अगदी विपरित यजुर्वेद्र त्यांची आपुलकी, त्यांचे प्रेम मिळवण्यातला तज्ज्ञ आहे. मला माझ्या लिखानातून लोकांना इजा पोचवण्यासाठी त्यांची टिका करावी लागते. पण वांछित परिवर्तन साध्य करण्यासाठी ते अतिशय आवश्यक असते. तरीही मला आशावादी राहून एक प्रेरणा जपावी लागते. त्यासाठी यजुर्वेद्र हा माझ्या आयुष्यातला आदर्श आहे. असं वारंवार म्हटलं गेलं आहे की शिक्षक वाचन करत नाहीत. बहुतेक वेळा ते याकडे दुर्लक्ष करतात हे खरोखरच निराशाजनक आहे. पण अशा निराशाजनक परिस्थितीतही हजारो शिक्षक पुस्तके विकत घेऊन केवळ त्यांचे वाचनच करत नाहीत तर त्यावर आधारित परीक्षा सुद्धा देतात हे दृश्य अविश्वसनीय असे आहे. पण दीपस्तंभने हे ही शक्य करून दाखवले आहे. शिक्षकांना पुस्तके विकत घेऊन, त्यांचे वाचन करून त्यावर आधारित परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करण्याचं काम यजुर्वेंद्र सतत करीत आहे. जर कधी काळी शिक्षकांचे एखादे राज्य स्थापित झाले, तर यजुर्वेद्र हे तिथले कायमस्वरूपी मुख्यमंत्री असतील. जर यजुवेंद्र सारखा सक्रिय कार्यकर्ता हे कार्य करू शकतो तर इच्छाशक्ती असल्यास आपले शासन सुद्धा हे करू शकते

हेरंब कुलकर्णी

आदर्श शिक्षक आणि शिक्षणतज्ञ

चला, आपण सर्वजण बदल घडवू

दीपस्तंभ हि स्वयंसेवी संस्था मुख्यतः लोकसहभागाद्वारे मिळणाऱ्या देणग्यांमधून चालते. आपण दिलेली देणगी दीपस्तंभच्या विविध उपक्रमामधील प्रज्ञाचक्षु, दिव्यांग, ग्रामीण, आदिवासी, अनाथ, विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी वापरली जाते.