आम्ही तुमच्या सोबत आहोत..

हा लॉकडाऊनचा काळ सर्वांसाठी अडचणीचा आहे परंतु दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांसाठी तो अधिक जास्त आव्हानात्मक असतो.म्हणून महाराष्ट्रभरातील आर्थिकदृष्ट्या असक्षम अपंग अनाथ, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना या लॉकडाऊन च्या काळात आणि नंतरही शिक्षण,आरोग्य व इतर कुठलीही अत्यावश्यक व तत्काळ मदत लागत असल्यास खालील क्रमांकावर संपर्क करावा. दीपस्तंभ मनोबलच्या वतीने शक्य तेवढे सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मागील काही महिन्यांत आम्ही 210 अनाथ व 240 अपंग विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे.

दीपस्तंभ फाऊंडेशनच्या मनोबल प्रकल्पाअंतर्गत दिव्यांग,अनाथ विद्यार्थ्यांच्या निवासी निःशुल्क उच्चशिक्षण, स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, शिष्यवृत्ती, कौशल्य प्रशिक्षण देण्यात येते.

तात्काळ मदत लागत असल्यास खालील क्रमांकावर संपर्क SMS / WhatsApp करावे.
संस्थेमार्फत विद्यार्थांना त्वरित संपर्क केला जाईल.

विशेष बाब म्हणजे :

कोल्हापूर येथील स्थानिक 120 गरजू अनाथ विद्यार्थी काम करून स्वतःचा उदरनिर्वाह करतात. लॉक डाऊनमुळे हे विद्यार्थि अडचणीत आली. त्यांना दीपस्तंभ फाउंडेशन तर्फे तीन दिवसांपूर्वीच मदत करण्यात आली. कोल्हापूर मधील मनीषा शिंदे यांनी विद्यार्थ्यांबाबत संस्थेला कळविले. दीपस्तंभ परिवारातील सदस्य श्री. राजेश झोलदेव (दिल्ली) , श्री. एरंडे, श्री. संदीप काटे (सातारा), डॉ. राजेश डाबी यांनी यासाठी योगदान दिले.

आम्ही तुमच्या सोबत आहोत..

या प्रकारच्या कार्यात सहभागी होऊन आपणास कुठल्याही प्रकारचे योगदान द्यायचे असल्यास जरूर कळवावे.आपल्या योगदानमुळे गरजू विद्यार्थ्यांना खूप मोठा आधार मिळेल.

संपर्क – 8380038713.